मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

नव्याने समाविष्ट गावांमध्ये भविष्यात अग्निशमन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याने प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज वाढणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

नव्याने समाविष्ट गावांमध्ये भविष्यात अग्निशमन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याने प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज वाढणार

निलेश राऊत
पुणे: शहरातील वाढत्या आपत्तीजन्य घटनांचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २२ स्टेशन ड्युटी ऑफिसर कर्मचाऱ्यांना नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ प्रशिक्षणासाठी पाठविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

शहरात आग, नैसर्गिक आपत्ती, वायुगळती, इमारती कोसळणे, रासायनिक दुर्घटना तसेच महापूर, भूकंप यांसारख्या आपत्कालीन घटनांमध्ये अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करावे लागते. पुणे आणि परिसरात रासायनिक कारखान्यांची वाढ होत असल्याने धोकादायक दुर्घटनांचे प्रमाण आणि स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. नव्याने समाविष्ट गावांमध्ये भविष्यात अग्निशमन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याने प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज वाढणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज हे देशातील अग्निशमन आणि बचाव कार्यासाठीचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र मानले जाते. येथे ‘स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर्स’ तसेच ‘डिव्हिजनल ऑफिसर्स’ या अभ्यासक्रमांतर्गत आधुनिक आपत्ती व्यवस्थापन, रासायनिक दुर्घटनांवरील नियंत्रण, बचाव कार्यातील समन्वय आणि अत्याधुनिक उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे शहरातील आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

शेअर करा