मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जागतिक वसुंधरा दिनी महापौर बंगल्यात १९ झाडांची कत्तल

वृक्षांना कीड लागल्याने तोडल्याचे प्रशासनाचे म्हणणे

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

जागतिक वसुंधरा दिनी महापौर बंगल्यात १९ झाडांची कत्तल

वृक्षांना कीड लागल्याने तोडल्याचे प्रशासनाचे म्हणणे

निलेश राऊत
पुणे: शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या पालिकेच्या निवासस्थानातील १९ झाडे कापण्यात आली आहेत. यातील काही झाडे बुंध्यापासून कापण्यात आली आहेत, तर काहींच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. पूर्ण वाढ झालेली बांबूची झाडेदेखील कापण्यात आली आहेत. बेकायदा वृक्षतोडीवर कारवाई करणाऱ्या आणि वृक्षलागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या महापालिकेनेच झाडांची कत्तल केल्याने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मागील चार वर्षे हा बंगला कुलूपबंद होता
महापौरांसाठी महापालिकेने घोले रस्त्यावर क्षेत्रीय कार्यालयालगत बंगला बांधला आहे. मागील चार वर्षे महापालिकेत सभासद नसल्याने हा बंगला कुलूपबंद होता. आता निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आल्याने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. महापौर मंजूषा नागपुरे अद्याप या बंगल्यात राहायला आलेल्या नाहीत. मात्र, त्यांच्या काही बैठका या बंगल्यात होत असल्याने बंगल्यातील वर्दळ वाढली आहे.

आवारात पूर्ण वाढ झालेले जुने वृक्ष आहेत
या बंगल्याच्या पुढील व मागील बाजूस मोठे अंगण आहे. त्यात अनेक वर्षांपासूनची पूर्ण वाढ झालेली झाडे आहेत. यातील सुमारे १९ झाडे कापण्यात आली आहेत. जागतिक वसुंधरा दिनी (२२ एप्रिल) ही झाडे कापण्यात आल्याची चर्चा आहे.

झाडांना कीड व धोकादायक फांद्या
दरम्यान, महापौर बंगल्यातील वृक्षतोडीबाबत माहिती घ्यावी लागेल. मात्र, येथील झाडांना कीड लागल्याचा व फांद्या धोकादायक झाल्याचा अहवाल दिला होता,' असे सहायक आयुक्त व वृक्ष अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी सांगितले.

काही कामानिमित्त मी या बंगल्यात आले होते. त्या वेळी मला झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. त्याबाबत विचारले असता, झाडांना कीड लागल्याने व काही फांद्या धोकादायक झाल्याने परवानगी घेऊन फांद्या तोडल्याचे सांगण्यात आले. - मंजूषा नागपुरे, महापौर

शेअर करा