मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

गुजरातमधील ‌बनासकांठा फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू

Gujrat Fire Crackers Factory Blast News : गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा औद्योगिक परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

गुजरातमधील ‌बनासकांठा फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू

Gujrat Fire Crackers Factory Blast News : गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा औद्योगिक परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाले. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ANI :- मंगळवारी (1 एप्रिल) गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा शहरात फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला.डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितले की, आगीनंतर झालेल्या मालिका स्फोटांमुळे शहराजवळील कारखान्याचा काही भाग कोसळल्याने अनेक कामगार अडकले होते.

बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल म्हणाले, "आज सकाळी आम्हाला डीसा औद्योगिक परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली." अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. अनेक जखमी मजुरांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. स्फोट इतका भीषण होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला.

जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्यात आला. आग इतकी भीषण होती की मृत कामगारांच्या शरीराचे भाग दूरवर विखुरले गेले. अपघातात जीव गमावलेल्या लोकांची संख्याही वाढू शकते, कारण अपघाताच्या वेळी 20 हून अधिक लोक उपस्थित होते असा संशय आहे. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 4 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा