मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुणे एसटी विभागाच्या ताफ्यात १० नव्या 'जिजाऊ' बस दाखल

बारामती आणि नीरा परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पुणे एसटी विभागाच्या ताफ्यात १० नव्या 'जिजाऊ' बस दाखल

बारामती आणि नीरा परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार

निलेश राऊत
पुणे: एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात शनिवारी (दि. १६ मे) दुपारी १० नव्या 'जिजाऊ' बस दाखल झाल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार या बस पुणे मुख्यालयात आल्या असून, यामुळे बारामती आणि नीरा परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पुणे मुख्यालयात आगमन होताच या बसचे तातडीने वाटप करून त्या बारामतीकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

शटल सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल
ताफ्यात दाखल झालेल्या १० बसचे बारामती डेपो आणि बारामती एमआयडीसी डेपोमध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे समसमान वाटप करण्यात आले आहे. बारामती डेपोला ५ बस देण्यात आल्या. या बसेस 'बारामती-निरा' मार्गावर धावणार आहेत, तर बारामती एमआयडीसी डेपोला ५ बस देण्यात आल्या. या बस स्वारगेट-बारामती एमआयडीसी डेपो या मार्गावर प्रवाशांच्या सेवेत तैनात असतील. दोन महिन्यांपूर्वी एक जिजाऊ नावाची बस एसटीच्या पुणे मुख्यालयात आली होती, जी सध्या स्वारगेट-बारामती मार्गावर यशस्वीपणे धावत आहे. आता आणखी १० बसची भर पडली आहे.

पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या या १० नव्या 'जिजाऊ' बसमुळे बारामती आणि स्वारगेट मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. शटल सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि सीसीटीव्हीमुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'सीसीटीव्ही'ची नजर
या सर्व बस 'शटल सेवा' म्हणून चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या बस '३ बाय २' आसन व्यवस्थेच्या म्हणजेच ५६ सीटर असतील. प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा विचार करून या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे न्युज

शेअर करा