मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
हयात असताना अजित पवारांवर ७० हजार कोटींचे आरोप, आता गुणगान : उद्धव ठाकरेंचे अमित शहा यांच्यावर टीकास्त्रअजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवारांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; CBI चौकशीची मागणीपुणे-सातारा रस्त्यावर बंगला फोडून ११.९५ लाखांचा ऐवज चोरीलाबेकायदेशीर मतदारांना वाचवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा : शेलारअजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहन

३४ व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन

३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

३४ व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत

पुणे : मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पिंपरी-चिंचवड आणि विमाननगर शोरूमच्या वतीने पिंपरी येथील एच. ए. ग्राउंड आणि येरवडा येथील तारकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी, शोरूम प्रमुख, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात योगदान देत परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.

पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन (ESG) या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मलाबार ग्रुपच्या वतीने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मलाबार ग्रुपच्या ९,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, "पर्यावरणाप्रती जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक प्रशासन या मूल्यांचा व्यावसायिक कार्यपद्धतीत समावेश करून ESG तत्त्वांना अधिक बळकटी देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या वर्षभरात देशभरात सुमारे १ लाख वृक्षांची लागवड करण्याचे ग्रुपचे उद्दिष्ट आहे."

व्यावसायिक कार्यासोबतच मलाबार ग्रुप समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रभावी सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये 'हंगर फ्री वर्ल्ड' हा भूकमुक्ती उपक्रम, वंचित मुलांसाठी मायक्रो लर्निंग सेंटर्स, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच ज्येष्ठ महिलांसाठी 'ग्रँडमा होम्स' यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत विकासाप्रती मलाबार ग्रुपची असलेली बांधिलकी स्पष्ट होते.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सविषयी

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची स्थापना १९९३ मध्ये झाली असून, ही कंपनी मलाबार ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. मलाबार ग्रुप हा भारतातील अग्रगण्य आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला व्यावसायिक समूह आहे. ९.४१ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या वार्षिक उलाढालीसह मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही जागतिक स्तरावरील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी ज्वेलरी रिटेल कंपनी आहे. कंपनीचे १४ देशांमध्ये ४५० हून अधिक शोरूम्सचे विस्तृत रिटेल नेटवर्क आहे.

भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आणि पूर्व आशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे कंपनीची कार्यालये, डिझाइन सेंटर्स, घाऊक विक्री केंद्रे तसेच उत्पादन सुविधा कार्यरत आहेत.

३,५०० हून अधिक भागधारकांच्या मालकीच्या या ग्रुपमध्ये २६ हून अधिक देशांतील ३०,००० पेक्षा जास्त व्यावसायिक कार्यरत असून, त्यांच्या योगदानातून ग्रुपच्या सातत्यपूर्ण विकासाला आणि प्रगतीला चालना मिळत आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper