मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक! इंडोनेशियाच्या अल्वी फरहानला नमवले

कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : सलग दुसऱ्या बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक! इंडोनेशियाच्या अल्वी फरहानला नमवले
कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : सलग दुसऱ्या बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

कुमामोटो : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने जपानमधील कुमामोटो मास्टर्स २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या अल्वी फरहानचा २१-१२, १५-२१, २१-११ असा पराभव केला. तब्बल ६९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात लक्ष्यने निर्णायक गेममध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

लक्ष्यने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करत २१-१२ असा सहज विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये फरहानने जोरदार पुनरागमन करत २१-१५ अशी बाजी मारली. त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लागणार होता. निर्णायक गेममध्ये लक्ष्यने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. अचूक स्मॅश आणि प्रभावी नेट प्लेच्या जोरावर त्याने फरहानला संधी दिली नाही. अखेर २१-११ असा गेम जिंकत लक्ष्यने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

विशेष म्हणजे, फरहानविरुद्ध लक्ष्यचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांत त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. जर्मनीतील हायलो ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर लक्ष्यने आता सलग दुसऱ्या बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.अंतिम सामन्यात लक्ष्यचा सामना थायलंडचा कुनलावुत वितिदसर्न किंवा जपानचा कोकी वतानाबे यांच्यापैकी एका खेळाडूशी होणार आहे. सलग दुसरे विजेतेपद मिळवण्याची संधी लक्ष्यसमोर असून, त्याच्या कामगिरीकडे भारतीय बॅडमिंटन चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सामन्याचा निकाल : लक्ष्य सेन विजयी – २१-१२, १५-२१, २१-११

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper