लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव
नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’चा दणदणीत विजय
1 મિનિટ વાંચન

लातूर :- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड झाली आहे. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.एकूण 19 जागांपैकी सहकार पॅनेलने तब्बल 14 जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निकालातून सहकार पॅनेलला संचालक मंडळात स्पष्ट बहुमत मिळालं होतं.
धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभारात सातत्य कायम; सहकार मंत्र्यांच्या चुलत बंधूंना उपाध्यक्षपदाची संधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले होते. निवडणुकीच्या निकालात ‘सहकार पॅनेल’ने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनेल’ला पराभवाचा सामना करावा लागला.या बहुमताच्या जोरावर नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी धीरज देशमुख यांचे नाव निश्चित करण्यात आले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना बँकेच्या कारभारात सातत्य राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
राजकीय समीकरणे आणि उपाध्यक्ष निवड
बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले अविनाश जाधव हे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणिते आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे लातूरच्या सहकार व राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
