मुंबई-पुणे महानगर क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी फडणवीसांची उच्चस्तरीय बैठक; पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा
मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली.
1 मिनिट वाचन

मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणी नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, ॲड. आशिष शेलार, गणेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही महानगर प्रदेशांमधील वाढती पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोत आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन या विषयांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
पुणे शहरासह महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी मिळण्याची मागणीही पुढे करण्यात आली आहे. शहराला भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यायी जलस्रोत आणि वाढीव पाणीकोट्याच्या नियोजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, या बैठकीतील विशिष्ट निर्णय किंवा प्रकल्पांची अधिकृत घोषणा अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे मुंबई आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




