मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यास भारताचा विरोधलातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजीसूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका

- तीन राज्यांना पावसाचा अलर्ट - उत्तर प्रदेशातील २१ जिल्ह्यांत धुक्याची शक्यता

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

हवामान

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे वादळ वायव्य दिशेने सरकत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील २१ जिल्ह्यांत धुक्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, राजस्थानमध्ये पावसामुळे थंडी वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळामुळे जोरदार वारे वाहण्यासह समुद्रात उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांना २० नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये पावसामुळे थंडी वाढली

राजस्थानमध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे सोमवारी थंडीत वाढ झाली. पावसाचा परिणाम दिवसाच्या तापमानावरही झाला असून, बिकानेर आणि जयपूर विभागातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. अलवर, सीकर, श्रीगंगानगर, करौली आणि फतेहपूर (सीकर) येथे रविवारी नेहमीपेक्षा अधिक थंडी जाणवली. हवामान विभागाच्या मते, राजस्थानमध्ये पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

केदारनाथमध्ये हिमवृष्टी; मैदानी भागांतही गारठा

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी रात्री उशिरा हिमवृष्टी झाली. यापूर्वी बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथेही बर्फवृष्टी झाली होती. या हिमवृष्टीचा परिणाम मैदानी भागांतील तापमानावर झाला असून, सोमवारी थंडीचा जोर वाढला.

मध्य प्रदेशात तापमान १५ अंशांच्या खाली

मध्य प्रदेशात इंदूर हे दुसरे सर्वात थंड शहर ठरले. जबलपूर आणि उज्जैनसह राज्यातील १६ शहरांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. तसेच, २० नोव्हेंबरनंतर राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर