कंपनीतील वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
सावरदरी येथील स्पार्कमिंडा कंपनीजवळील घटना
1 मिनिट वाचन

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : कंपनीतून काम संपवून घरी जात असलेल्या तरुणाला अडवून तिघांनी लाकडी दांडका आणि वायरने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास स्पार्कमिंडा कंपनीजवळ सावरदरी येथे घडली.
रोहित रोशनलाल नकले (२५, सावरदरी, खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज दवणे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित कंपनीतील काम सुटल्यावर सावरदरी गावाच्या दिशेने आपल्या रूमवर जात होते. रोहित यांच्या पत्नीला आरोपीने कंपनीत त्रास दिला होता. त्याबाबत त्यांनी आरोपीला जाब विचारला होता. या कारणावरून सुरज दवणे आणि त्याच्या दोन साथीदारांनी रोहित यांना रस्त्यात अडवले. त्यांना शिवीगाळ आणि धमकी देत लाकडी दांडका, वायर आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला करून गंभीर दुखापत केली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




