मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
हयात असताना अजित पवारांवर ७० हजार कोटींचे आरोप, आता गुणगान : उद्धव ठाकरेंचे अमित शहा यांच्यावर टीकास्त्रअजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवारांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; CBI चौकशीची मागणीपुणे-सातारा रस्त्यावर बंगला फोडून ११.९५ लाखांचा ऐवज चोरीलाबेकायदेशीर मतदारांना वाचवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा : शेलारअजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहन

आता रुग्णवाहिकेतच मिळणार आयसीयू दर्जाचे उपचार

राज्यात ३०० नव्या रुग्णवाहिका सेवेत

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

रुग्णवाहिका

नागपूर, प्रतिनिधी : रुग्णवाहिकेतच रुग्णांना अतिदक्षता विभागाच्या धर्तीवर तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारकडून ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३०० अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार असून, येत्या २ तारखेला मुंबईतून या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेत रुग्ण दाखल होताच डॉक्टर आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने उपचार सुरू केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी नागपूर येथे दिली.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने २० महिन्यांच्या बालकाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. २०१३-१४ च्या दरम्यान सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेचे आता नव्या निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. नव्या रुग्णवाहिकांमध्ये ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. रुग्णाला रुग्णवाहिकेत दाखल केल्यानंतर रुग्णालयात पोहोचेपर्यंत केवळ वाहतुकीऐवजी उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३०० रुग्णवाहिका ताफ्यात दाखल होणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी राज्यभरात ‘आरोग्य संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

रुग्णालयांचे वार्षिक फायर ऑडिट अनिवार्य

भंडारा आणि अमरावती येथील रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे दरवर्षी फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर