पुणे

PMC News : पुण्यातील कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय स्वच्छतेत प्रथम

महापालिकेच्यावतीने ‘विशेष स्वच्छता सप्ताह‘ स्पर्धेचे आयोजन

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : महापालिकेने पुणे शहरात लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘विशेष स्वच्छता सप्ताह‘ स्पर्धेत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवत पन्नास लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले आहे.द्वितीय क्रमांक घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने, तर तृतीय क्रमांक नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालयाने पटकावला आहे.PMC News

पुणे महापालिकेच्यावतीने दि. २२ ते २८ जुलैदरम्यान शहरात आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता सप्ताह स्पर्धेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावत घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने पंचवीस लाख, तर नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालयाने पंधरा लाख रूपयांचे बक्षिस पटकावले. याशिवाय वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिकांनी गौरविण्यात आले.PMC News

महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित या कार्यक्रमात महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांच्या हस्ते विजेत्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय, सुरक्षेची काळजी घेत सफाई सेवकांना प्रातिनिधिक स्वरूपात पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, उपायुक्त अविनाश संकपाळ, माधव जगताप, विजयकुमार थोरात आणि आशा राऊत यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.PMC News

नदी, नाले, तलावांसह जलस्रोतांची स्वच्छता, ई-कचरा, प्लास्टिक कचरा, जुने फर्निचर, गाद्या आणि अन्य निरुपयोगी वस्तूंचे संकलन, घरातील अडगळ काढण्याचे विशेष अभियान, देव-देवतांच्या जुन्या फोटोंचे संकलन तसेच सार्वजनिक व वस्त्यांतील शौचालयांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला.PMC News

डीप क्लीनिंग’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छता सप्ताहाच्या कालावधीत पुणे महापालिकेच्या सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक रस्ते, वाहतूक केंद्रे, बस व रेल्वे स्थानके, रिक्षा स्टँड, विमानतळ परिसर, शाळा, मंडई, बाजारपेठा, व्यावसायिक भाग, सरकारी इमारती, आरोग्य कोठ्या, झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये विशेष ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’ राबविण्यात आला.

कचऱ्याचे विक्रमी संकलन

या स्वच्छता मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल १५ हजार ७२६ नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, या सप्ताहात शहरातून विक्रमी स्वरूपात कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये ओला कचरा ६३.१ मेट्रिक टन, सुका कचरा ८६.७ मेट्रिक टन, राडारोडा (बांधकाम व पादचाऱ्यांचा कचरा) २४७.३ मेट्रिक टन, प्लास्टिक कचरा ४.५ मेट्रिक टन, गाद्या, फोम, कापड व अडगळीचे साहित्य ५.२ मेट्रिक टन, देव-देवतांचे जुने फोटो ७४३ नग

या निकषांवर केले मूल्यमापन

सार्वजनिक रस्ते, बसस्थानके, शाळा, बाजारपेठा, कॉर्पोरेट कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि कचराकुंडीमुक्त ठिकाणे आदी घटकांचा समावेश होता.PMC News

PMC News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button