Maharashtra Politics : रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, रायगडचा बुलंद आवाज अजित पवारांच्या पक्षात

•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रायगडच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश, भरत भोगावले यांचे डोकेदुखी वाढणार
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रायगडच्या नेत्या आणि महाड जिल्ह्याच्या माजी नगराध्यक्षा यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये स्नेहल जगताप यांना भरत भोगावले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये स्नेहल जगताप यांना 92 हजार मतदान झाले होते.

स्नेहल जगताप यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यावर त्यांची तोफ अवघ्या राज्याने पाहिली. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यामुळे भरत गोगावलें यांच्यासाठी मोठा ताप ठरला असल्याचे म्हटले जात आहे.
पक्षप्रवेशानंतर स्नेहल जगताप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत माझ्यावर 92 हजार लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाला डोळ्यांसमोर ठेवून, विकासात्मक दृष्टीकोन ठेवून माझा मतदारसंघ पुन्हा प्रगतीपथावर आणणायचा आहे, त्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणुकीनंतरही आम्ही साहेबांच्या कायम संपर्कात होतो. पक्षनेतृ्त्वावर कोणतीही नाराजी नाही. त्यांच्यावर प्रेम, आदर आहेच. ते कायम राहणार आहे. पण स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”