महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस!

महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. या दिवसापासून 2 जानेवारी हा पोलिस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 36 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.
1936 मध्ये सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे नाव ठेवले गेले. 1956 नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी झाली. यानंतर महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी करण्यात आली. 1961 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. पोलिस दलाची अधिकृत स्थापना झाली. राज्यात हा दिवस पोलिस स्थापना दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी 1672 पासून रक्षक नेमले गेले होते. यास भंडारी ब्रिगेड नावाजी फौज अधिक शिस्तबद्ध होती.
‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.
महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक
•गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
•राज्य गुप्तवार्ता विभाग
•क्राइम सरविल्ययंस इंटेलिजन्स कौन्सिल (CSIC)
•महाराष्ट्र महामार्ग पोलीस
•राज्य राखीव पोलीस बल
•प्रशिक्षण आणि खास पथके
•नागरी हक्क संरक्षण विभाग
•मोटार परिवहन विभाग
•पोलीस बिनतारी संदेश विभाग
•भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग