Maharashtra News: महायुतीचे नेते राज्यपालांना दुपारी 3.30 वाजता भेटणार, सरकार स्थापनेचा दावा करणार
Maharashtra Breaking News: महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी दुपारी 3.30 वाजेची वेळ मागितली आहे.आज (बुधवारी) सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे.
मुंबई :- महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी (4 डिसेंबर) राज्यपाल सीपी राधाकृष्णन Maharashtra Governor Radha Krushna यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दुपारी 3.30 वाजता महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. प्रत्यक्षात दुपारी 1.30 वाजेपर्यंत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल.त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. बुधवारीच भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
विधिमंडळ पक्षनेते निवडीपूर्वी भाजप कोअर कमिटीची बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे. दरम्यान, भाजपचे महाराष्ट्राचे निरीक्षक विजय रुपाणी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचले. ते म्हणाले की आम्ही निरीक्षक आहोत आणि आम्ही आमचे काम करत आहोत.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, बैठकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळेल.