पुणे

Pune News : प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune News : गणेशोत्सवातील डीजेच्या विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला


Pune News : पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि ढोलवादनाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रोडवरील कशाळे चौकात हल्ला करण्यात आला. गणेशोत्सवाला विरोध केल्याच्या कारणावरून संतोष चव्हाण याने बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चव्हाणला अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संतोष पंडित यांनाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, मतभेद असताना हल्ला करणे योग्य नाही. पुण्यासारख्या शहरात असे वाद योग्य वाटत नाहीत,” असे म्हटले.https://maharashtramirror.com/ Pune News
विद्यानंद बापट हे पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक तिथे आलेल्या गणेश मंडळाचा कार्यकर्ता संतोष चव्हाण यानं कानशिलात मारली. त्यावेळी तिथं असलेल्यांनी संतोष चव्हाणला बाजूला ढकलल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र या प्रकरणी संतोष चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही हल्ला निंदनीय असल्याचं म्हटलंय.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , मारहाण करणं योग्य नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडत असताना हल्ला करणं योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत. संतोष पंडित यांच्या अटकेवर मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं नाही.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला निंदनीय आहे. गणेशोत्सव काळात अशी घटना योग्य नाही. गणेश मंडळांना सांगू इच्छितो की संयम ठेवा. त्यांच्यासोबत जाऊन हिंसा करणे अयोग्य, वक्तव्य करताना नियम पाळले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, आम्ही तुमच्यासोबत आहोत.https://maharashtramirror.com/ Pune News
संतोष चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. विद्यानंद बापट यांना पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. तसंच बापट यांच्या विरोधातही अर्ज पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button