CRIME NEWS : चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या

संशयित पत्नीचा छळ करून तिच्याशी भांडत असे
पिंपरी, CRIME NEWS: विद्यानगर चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (२८ जून) दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली.CRIME NEWS

वैशाली नागनाथ कांबळे (३५, रा. चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ दत्तु कांबळे (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागनाथ हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे. तो पत्नी वैशाली यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना त्रास देत असे. याच कारणावरून त्याने पत्नी वैशाली यांच्यासोबाबत रविवारी पुन्हा भांडण केले. या भांडणात त्याने वैशाली यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS


