‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ चढला बोहल्यावर!
गौरव मोरेने उरकले गुपचूप लग्न
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याने गुपचूप साध्या पद्धतीने लग्न उरकले असून, त्याचे फोटो सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. गौरवने स्वतः त्याच्या लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने समाजमाध्यमावर गौरवच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “Mr & Mrs मोरे” असे कॅप्शन दिले आहे.

ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोत गौरव चंदेरी रंगाच्या कुर्त्यात तर त्याची पत्नी साडी, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक वेषात दिसत आहे. गौरवच्या पत्नीचे नाव प्रियांका कारेकर असून, ती मूळची मुंबईतील लालबाग-परळ परिसरातील राहणारी असून, ती स्वतः सुद्धा मनोरंजन विश्वाशी संबंधित आहे. प्रियांका उत्तम अभिनेत्री असून तिने अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केले आहे. विशेष म्हणजे, तिने बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या ‘चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या हिंदी चित्रपटात साऊथ सुपरस्टार दुलकर सलमान सोबत स्क्रीन शेअर केली होती. गौरव आणि प्रियांका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
Gaurav More got married

