देश-विदेशविशेष

Delhi Metro News: आंदोलनाच्या दिवशी मेट्रो सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा

Delhi Metro News:नवी दिल्ली : दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजीचे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेले निर्बंध आणि दिल्ली मेट्रो स्थानके बंद करण्याच्या निर्णयावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने न्यायालयात आपले स्पष्टीकरण आणि उत्तर दाखल केले आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली मेट्रोची कोणतीही सेवा रद्द करण्यात आली नव्हती, असं उत्तर मेट्रो प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आलं आहे. मागील सुनावणीदरम्यान, मेट्रो आणि रेल्वे सेवा विनाकारण बंद न करण्याच्या न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने गृहसचिव गोविंद मोहन, दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि DMRC अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.https://maharashtramirror.com/ Delhi Metro

न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी


DMRC च्या अध्यक्षांनी न्यायालयात वैयक्तिकरित्या एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, ते सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण आदर करतात आणि 9 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील कोणत्याही संभाव्य अवमाननेसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. DMRC ने न्यायालयात स्पष्ट केले की, मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांमध्ये किंवा गाड्यांच्या संख्येत कोणतीही कपात करण्यात आली नव्हती आणि कोणतीही सेवा रद्द केली गेली नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच मेट्रोचे संचालन झाले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button