पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : अमराठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र राज्यात अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक आणि चालकांसाठी “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान” या प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे आणि विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. https://maharashtramirror.com/ Pune News   
राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभागाच्या विद्यमाने महात्मा गांधी जयंती ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती (दि. ०२.१०.२०२६ ते २३.०१.२०२७) या कालावधीत हा दुसरा टप्पा निर्धारित केला आहे.   

या प्रशिक्षणाबाबतची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:


सत्र व वेळ: कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या प्रशिक्षकांद्वारे हे प्रशिक्षण चार सत्रांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. ही पाठ्यक्रम कार्यशाळा दररोज दुपारी ३ ते ४ या वेळेत घेतली जात आहे.
प्रमाणपत्र अनिवार्य: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांचे जुजबी व्यावहारिक मराठी ज्ञान तपासले जाईल आणि त्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र परिवहन विभागातर्फे सर्व अमराठी चालकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांनी जारी केलेले प्रमाणपत्रच वैध मानले जाईल.
आवश्यक कागदपत्रे: कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी चालकांनी [[Aadhaar Redacted]], रिक्षा/टॅक्सी परवाना, लायसन्स आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
स्थळ: प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिजजवळ, पुणे येथील सहकार सभागृह (पहिला मजला) येथे ही कार्यशाळा पार पडत आहे.
तरी सर्व संबंधित अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी दिनांक २३.०१.२०२७ पर्यंत दुपारी ३ ते ४ या वेळेत या कार्यशाळेत उपस्थित राहून मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button