पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : एनईएसडीए २०२५ नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हावे; पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) नागरिकांना आवाहन

Pune News :पुणे : प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागामार्फत (डीएआरपीजी) ‘नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट’ (एनईएसडीए) २०२५ अंतर्गत विशेष नागरिक सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नागरिकांना या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

वाहन नोंदणी (व्हेईकल रजिस्ट्रेशन), शिकाऊ वाहनचालक अनुज्ञप्ती जारी करणे (लर्नर्स लायसन्स) आणि वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती जारी करणे (ड्रायव्हिंग लायसन्स) या परिवहन पोर्टलद्वारे (https://parivahan.gov.in) उपलब्ध करून देण्यात आलेल्या तीन प्रमुख सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांकडून अभिप्राय जाणून घेणे, हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीची थेट लिंक (https://forms.gle/MPDGVJ&tKPBnMKSEA) एनईएसडीए वेब फॉरवर्ड पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर तसेच आरटीओच्या निवेदनात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाइन सर्वेक्षणात आपला अभिप्राय नोंदविण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ आहे. वरील तीन सेवांपैकी कोणत्याही सेवेचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button