पुणेठाणेठाणेपिंपरी चिंचवडमुंबई

Thane News : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! मिनाक्षी शिंदेंचे पोलीस आयुक्तांना पत्र; पूर्णेकर कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणी

Thane News :ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून होत असतानाच माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पूर्णेकर कुटुंबीयांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांकडून मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत, त्याच कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

विरोधकांकडून कुटुंबाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप
मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनानंतर काही राजकीय पक्षांचे नेते या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गट आणि मनसेच्या काही नेत्यांची नावे त्यांनी पत्रात नमूद केली आहेत.https://maharashtramirror.com/ Thane News

या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. समाजमाध्यमांवरून एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून, जनआंदोलनांच्या नावाखाली आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

पूर्णेकर कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती
गेल्या काही दिवसांतील राजकीय वक्तव्यांमुळे ठाणे शहरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. राजकीय विरोधकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडवून आणला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या दुःखाच्या परिस्थितीतून जात आहेत. अशा वेळी या कुटुंबाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीय तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

आदित्य ठाकरेंसोबत आरोपीचा फोटो असल्याचा दावा
पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत हत्या प्रकरणातील आरोपी नितेश पवार उर्फ भावड्या दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित छायाचित्र आणि माहितीही पत्रासोबत जोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच प्रदीप पूर्णेकर यांनी यापूर्वी सोशल मीडियावर राजन विचारे यांच्या विरोधात पोस्ट आणि कमेंट केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. बाळू पूर्णेकर आणि राजन विचारे यांच्यात पूर्वीपासून मतभेद होते, तसेच बाळू पूर्णेकर यांना पदावरून हटवण्यात आल्याचा दावाही मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच
एकीकडे पूर्णेकर कुटुंबीयांकडून मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर आरोप करत अटकेची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे मिनाक्षी शिंदे यांनी विरोधकांवर राजकीय कटकारस्थानाचे आरोप केले आहेत. आता त्यांनीच पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केल्याने या प्रकरणाला वेगळे राजकीय वळण मिळाले आहे.

दरम्यान, मिनाक्षी शिंदे यांनी केलेले आरोप आणि व्यक्त केलेली भीती याबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका काय असणार, तसेच पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button