Pune Crime : दीड वर्षापासून फरार असलेले दोघे जेरबंद
Pune Crime : सुसगाव आणि कात्रज परिसरात गुन्हे शाखेची कारवाई
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. सागर शैलेश गायकवाड (वय २५, रा. सुसगाव) आणि आकाश शैलेश गायकवाड (वय २६, रा. कात्रज) अशी त्यांची नावे आहेत. सुसगाव आणि कात्रज–कोंढवा परिसरात २१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांच्या माहितीनुसार, पथकातील अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी सागर गायकवाड हा सुसगावातील श्री माऊली ओल्डएज होम येथे नोकरी करीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे यांना मिळाली. आकाश गायकवाड हा कात्रज–कोंढवा परिसरातील टिळेकरनगर येथील वर्ल्ड फिटनेस जिममध्ये काम करीत असल्याची माहिती अंमलदार अमित गद्रे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने दोन्ही ठिकाणी सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे, परमेश्वर नरवडे, साईकुमार कारके, साधना पवार आणि अजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ज्वेलर्स दुकानातील घरफोडी प्रकरणी दिल्ली येथून आरोपीला अटक
एकतीस लाखांची १३.७१२ किलो चांदी हस्तगत
पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंढवा-मांजरी रोडवरील ७३ अॅव्हेन्यू कॉम्प्लेक्स येथील आराध्या ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूच्या खोलीतून गॅसकटरने भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व पूजेचे साहित्य तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३१०(२), ६१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना मांजरी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट यांच्या पथकाने यापूर्वी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यापैकी तीन आरोपींना अटक केली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम परिमंडळ ६ चे पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल, लोणीकाळभोर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी उदमले, तसेच मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
त्यानुसार तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) इरफान नदाफ, तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, तपास पथक अंमलदार प्रदीप सोनवणे, पोलीस अंमलदार संदीप राठोड यांच्या तपास पथकाने दिल्ली येथे जाऊन दि. ०६ ऑक्टॉबर रोजी जामा मशीद परिसरातून संशयित कासीम मोहसीन शेख (वय ४१, रा. चांदणी चौक, दिल्ली) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात तो सोने-चांदीचे दागिने बनविण्याचे काम करणारा कारागीर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील पाहिजे आरोपी त्याचा नातेवाईक असून, त्याच्याकडून चांदीचे दागिने घेऊन कासीम शेख याने ते दिल्ली येथे विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली.
रिमांड मुदतीत पोलीस निरीक्षक इरफान नदाफ (गुन्हे), मांजरी पोलीस ठाणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन आरोपीकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १३.७१२ किलो चांदी (अंदाजे किंमत एकतीस लाख रुपये) हस्तगत केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) इरफान नदाफ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, गणेश काकडे, प्रकाश बेरड, अशोक अंधारे, रविकांत कचरे, चंद्रकांत रेजितवाड, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, अशफाक शेख, वैभव ओहोळ, अमोल जगधने यांच्या तपास पथकाने केली आहे.


