PMC: ‘रस्ते असे कसे खचले?’ आयुक्त नवल किशोर राम यांचा अधिकाऱ्यांना जाब

PMC : शहरातील खालावत चाललेल्या रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC : शहरातील खालावत चाललेल्या रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे कसे निर्माण झाले, असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. PMC potholes commissioner reproaches road

शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेताना आयुक्तांनी रस्ते विभागाचा कारभार अत्यंत “निकृष्ट” असल्याचे म्हटले. तसेच पुढील एका महिन्याच्या आत शहरातील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, रस्ते खोदकामाची दुरुस्ती (रिस्टोरेशन) करण्यासाठीचे प्रलंबित ७५ कोटी रुपयांचे टेंडर तातडीने मंजूर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, अनेक रस्त्यांवर खोदकाम झाल्यानंतर त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती व डागडुजी न केल्यामुळेच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्ते विभागाचा कारभार समाधानकारक नाही. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. खोदकामाची अयोग्य पुनर्रचना आणि विविध महापालिका विभागांमधील समन्वयाचा अभाव ही या समस्येमागील मुख्य कारणे आहेत,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
MH 12 पुण्याची ऐतिहासिक ओळख कायम राहणार?
पाणीपुरवठा, जलनिःसारण , वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मान्सूनमध्ये विविध यंत्रणांनी आणि महापालिकेच्या विभागांनी रस्ते खोदाई केली होती. परंतु, अनेक रस्ते आणि पादचारी मार्ग पूर्ववत स्थितीत न आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. PMC

यंदाच्या वर्षी अनेक युटिलिटी एजन्सीज आणि महापालिका विभागांना रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली होती. इंधनाची टंचाई असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला देखील थेट रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली होती. परंतु, खोदाई केलेले रस्ते नियमानुसार पूर्ववत न केल्यामुळेच पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करण्यात आला आहे. PMC
तसेच, अनेक रस्त्यांवर पुरेशी पर्जन्य जलवाहिनी (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याखाली झिरपले. यामुळे रस्त्यांचा पाया कमजोर होऊन रस्ते खचल्याचेही आयुक्तांनी निदर्शनास आणले.
रस्त्यांच्या या दुर्दशेमुळे पुण्यातील अनेक भागांत वाहतूक धिम्या गतीने होत असून, खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेमार्फत खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी, केलेले डागडुजीचे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असून अल्पावधीतच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
PMC: आयुक्तांची खुर्ची थोडक्यात वाचली; आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये स्पष्टपणे समन्वयाचा अभाव असल्याचे ताशेरे आयुक्तांनी ओढले. प्रभागांमधील खड्डे बुजवण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर सोपवण्यात आली होती, परंतु अनेक कार्यालये हे काम प्रभावीपणे पार पाडण्यात अपयशी ठरली आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खड्डे दुरुस्तीचे टेंडर अद्याप प्रलंबित असून, या दिरंगाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त प्रकाश दिवटे यांनी माहिती दिली की, महापालिकेने गेल्या काही दिवसांत ‘कोल्ड मिक्स’, ‘हॉट मिक्स’ आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे ८,000 चौरस मीटर परिसरातील खड्डे दुरुस्त केले आहेत. पावसात ‘कोल्ड मिक्स’ तर कोरड्या हवामानात ‘हॉट मिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून कामाला वेग देण्यात येत आहे. PMC
रस्त्यांच्या खराब स्थितीवरून वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने आता संपूर्ण शहरात खड्डे बुजवण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे.
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

