Mumbai news : गोकूळ दूध संघ अमूलला विकण्याचा डाव? चार संचालक नियुक्तीवरून संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप!
Mumbai news : मुंबई : कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गोकूळ दूध संघात चार अतिरिक्त संचालक नियुक्त करून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर गोकूळ दूध संघ अमूलला विकण्याचा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला.https://maharashtramirror.com/ Mumbai news
सतेज पाटील यांच्या बहुमताचा अनादर केल्याचा आरोप
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बहुमत मिळूनही त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून सरकारला स्वतःचे बहुमत निर्माण करायचे आहे, असेही ते म्हणाले..https://maharashtramirror.com/ Mumbai news
अमित शाहांनाही दिला संदेश
सहकार क्षेत्रातील संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. गोकूळ संघ अमूलला विकण्याचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन गोकूळच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवरूनही टीका
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरूनही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानांवर आक्षेप घेतला. गोकूळमधील संचालक नियुक्ती आणि बहुमताचा मुद्दा आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.


