पुणे

Pune News : शंभरीकडे निघालेली साखर आता ४८ रुपयांवर!

स्मिता कुलकर्णी

Pune News पुणे : काही दिवसांपूर्वी किलोला ७५ रुपयांपर्यंत पोहोचलेली आणि दिवाळीपर्यंत शंभरी गाठण्याची शक्यता व्यक्त झालेली साखर आता पुन्हा स्वस्त झाली आहे. साखरेची उपलब्धता वाढणे, नवीन हंगामातील साखर बाजारात येण्याची तयारी आणि केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे दरात मोठी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर आता सुमारे ४८ रुपये किलोपर्यंत खाली आला असून, घाऊक बाजारात ४६.५० ते ४७ रुपये किलो दराने साखरेची विक्री होत आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
जुलैपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. ऑगस्टमध्ये या दरवाढीने उच्चांक गाठला. पुण्याच्या किरकोळ बाजारात साखरेचा दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. वाढती मागणी, बाजारातील तुटवडा आणि साखरेच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचा दर १०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यताही त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.https://maharashtramirror.com/ Pune News
गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे ₹१५ घट झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जुलै ते ऑगस्टमध्ये साखरेचे दर सतत वाढत होते, किरकोळ बाजारात दर ₹७०-₹७५ पर्यंत पोहचले होते. केंद्र शासनाने विदेशातून १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दरात घसरण झाली. सणासुदीच्या काळात — गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी — साखरेची मागणी वाढल्याने किंमतीत थोडी वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात साखर ₹५५-₹५७ प्रती किलो दराने विकली जात आहे. केंद्र शासनाने सप्टेंबरमध्ये १३ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे आणि १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांना सुरूवात करण्यास परवानगी दिली आहे. दरवाढ नियंत्रणासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे.
मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. तसेच साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी साखरेच्या साठ्यावर निर्बंध घातले. या उपाययोजनांनंतर बाजारातील उपलब्धता वाढण्यास सुरुवात झाली आणि दरात घसरण झाली. केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टच्या अखेरीस कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात सुमारे २० टक्क्यांची घट झाली होती.
७५ रुपयांवरून थेट ४८ रुपयांवर
पुणे मार्केट यार्डातील भुसार विभागात सध्या साखरेची आवक आणि बाजारातील पुरवठा सुरळीत होत आहे. रोजची आवक सुमारे १२५ टनांवरून ७० ते ८० टनांवर आली असली, तरी उपलब्ध साठ्यामुळे बाजारात तुटवडा जाणवत नाही. घाऊक बाजारात सध्या साखरेला ४६.५० ते ४७ रुपये किलो दर मिळत आहे.
यापूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात साखरेचे दर ५५ ते ५७ रुपये किलोपर्यंत होते. म्हणजेच त्यानंतरही दरात आणखी घट झाली आहे.
नवीन हंगामामुळे पुरवठा वाढणार
नवीन हंगामातील साखर बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर उपलब्धता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये साखरेचे उत्पादन वाढून सणासुदीच्या काळात बाजारातील पुरवठा सुधारण्याची शक्यता आहे.
दिवाळी गोड; मात्र पुढील दराकडे लक्ष
साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. दसरा, दिवाळी, फराळ आणि मिठाईच्या हंगामात साखरेची मागणी वाढत असते. त्यामुळे सध्या दर ४८ रुपयांपर्यंत खाली आल्याने सर्वसामान्यांच्या सणावरील खर्चाचा काहीसा भार कमी झाला आहे.
मात्र, दिवाळीत मागणी किती वाढते, नवीन हंगामातील साखरेची आवक किती होते आणि बाजारातील साठा कसा राहतो, यावर पुढील काळातील दर अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे ७५ रुपयांवरून ४८ रुपयांपर्यंत आलेल्या साखरेच्या दराने ग्राहकांना दिलासा दिला असला, तरी दिवाळीनंतर बाजाराची दिशा काय राहते, याकडे व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

“शासनाने साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा घेतलेला निर्णय साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढून दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत होईल.
मात्र, हा केवळ तात्पुरता उपाय आहे. गाळप हंगाम संपल्यानंतर पुन्हा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साखरेच्या दरातील चढ-उतारावर दीर्घकालीन नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ठोस आणि शाश्वत धोरण आखणे गरजेचे आहे.”
— मुकेश गोयल
व्यापारी, बाजारतज्ज्ञ, मार्केट यार्ड

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button