क्राईम न्यूज
Trending

Pune Crime News : लोणी काळभोर : माजी सरपंचाकडून शेतजमिनीच्या वादातून बाउन्सरद्वारे मारहाण

  • पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून बेकायदेशीर ताबा मिळवत पिकांचे नुकसान करणे, तसेच विरोध करणाऱ्यांना बाउन्सरच्या मदतीने मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कवडीगाव येथे घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सुमारे पंधरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. Pune Crime News

चित्तरंजन गायकवाड, ओम गायकवाड यांच्यासह इतर १३ ते १४ अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. सविता दादासो झगडे (वय ५०, रा. कवडीगाव, ता. हवेली) यांनी याबाबत फिर्याद दिली. Pune Crime News

pune crime news lonikalbhor

फिर्यादी यांची कवडीगाव येथील गट नंबर ४२४ मध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीचा वाद सध्या न्यायालयप्रविष्ट असताना, आरोपी चित्तरंजन गायकवाड यांनी २९ जून रोजी दहा ते बारा अज्ञात लोकांच्या मदतीने शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील मुळा व मका पिकांचे तसेच पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान केले. तसेच, क्रेनच्या मदतीने शेतात ‘डेमो हाऊस’ बसवण्याचा प्रयत्न केला. याला फिर्यादींचा मुलगा हर्षल झगडे आणि पुतण्या प्रणव झगडे यांनी विरोध केला असता, आरोपी गौरी गायकवाड यांच्या सांगण्यावरून ओम गायकवाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या सात ते आठ बाउन्सरनी बेदम मारहाण केली. तसेच, “यापुढे शेतात दिसलात तर मारून टाकू,” अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे पुढील तपास करत आहेत.

PUNE NEWS : महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतीला करात ५०% सवलतीवर शिक्कामोर्तब

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button