पुणेमहाराष्ट्र

Pune News : डीजे बंदीवर पोलीस आयुक्त ठाम; बहुसंख्य मंडळांचा पाठिंबा

Pune News : गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे, ‘प्लाझा आणि मिड प्रेशर साऊंड सिस्टीम’वर पूर्ण बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई करण्याचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

Pune News : पुणे, धनश्री ओतारी : आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीव्र आवाजातील डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापरावरून वाद पेटला आहे. पुणे पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेत उत्सवात कर्णकर्कश डीजे, ‘प्लाझा आणि मिड प्रेशर साऊंड सिस्टीम’वर पूर्ण बंदी कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

दुसरीकडे, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि विविध सामाजिक संस्थांनी पुण्याचा गणेशोत्सव डीजेमुक्त असावा, अशी आक्रमक भूमिका घेत पारंपरिक वाद्यांच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, या भूमिकेमुळे पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळ यांच्यात राजकीय व सामाजिक पातळीवर चर्चेचे आणि संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

कोणतीही तडजोड केली जाणार नाही
सोमवारी महापालिकेत पार पडलेल्या पूर्वतयारी बैठकीनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीजेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे स्पष्ट केले. उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यास हरकत नाही, परंतु नागरिकांच्या शांततेचा अधिकार हिरावून घेणाऱ्या व ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाच्या प्रणालींना पाठिंबा दिला जाणार नाही. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार आहे. डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यात येणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

नियमांचे उल्लंघन करून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. थेट डीजे जप्ती करण्यात येईल. डीजे, प्लाझा तसेच मिड प्रेशर सारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांवर पूर्णपणे बंदी राहणार, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

स्पीकरवर निर्बंध आणण्यापेक्षा शहरात कडक दारू बंदी करा
पोलिसांच्या या निर्बंधांवर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. “नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो ढोल वाजवले जातात, मग तिथे ध्वनिप्रदूषण होत नाही का?” असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. स्पीकरवर निर्बंध आणण्यापेक्षा शहरात कडक दारू बंदी करा आणि हुल्लडबाजांवर कायदेशीर वचक ठेवा,” अशी मागणी एका कार्यकर्त्याने आक्रमकपणे केली. https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्यात गणेशोत्सव डीजेमुक्तच हवा – पुनीत बालन
उद्योजक पुनीत बालन यांनी पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा दाखला देत डीजेमुक्त गणेशोत्सवाचे जोरदार समर्थन केले आहे. १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य २००५-०६ नंतर डीजेच्या संस्कृतीमुळे धोक्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डीजेच्या दणदणाटात अश्लील गाण्यांवर होणारी नृत्ये आपल्या संस्कृतीला शोभत नाहीत, असे मत त्यांनी मांडले. https://maharashtramirror.com/ Pune News

पारंपरिक वाद्यांच्या बाजूने १५० हून अधिक मंडळे मैदानात
२००६ पासून गणेशोत्सवाला डीजेचे गालबोट लागले आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि साऊंडच्या भिंतींसमोर वाजवली जाणारी गाणी आणि होणारी नृत्ये ही आपल्या संस्कृती आणि परंपरांना साजेशी नाहीत, अशी खंत बालन यांनी यावेळी व्यक्त केली. मंडळात ५० ते १०० कार्यकर्ते असले तरी डीजेच्या समोर हजारो युवक अश्लील गाण्यांवर नाचतात, जे पूर्णपणे चुकीचे असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. पुण्याचा गणेशोत्सव हा पूर्णपणे सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांनीच साजरा व्हावा, यासाठी डीजेमुक्त गणेशोत्सवाची हाक देण्यात आली आहे. या संघर्षात जे गणेश मंडळ आणि पुणेकर सोबत असतील, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेला पाठिंबा देत आजघडीला कमीत कमी १५० ते २०० सार्वजनिक गणेश मंडळे पारंपरिक वाद्यांच्या बाजूने या संघर्षात सोबत असल्याचे पुनीत बालन यांनी म्हटले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी ‘प्लाझा स्पीकर’ आणि ‘लेजर लाईट’वर शंभर टक्के बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर, निसर्गसेवक संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सोलापूर पॅटर्नप्रमाणे पुण्यातही सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ध्वनियंत्रणामुक्त गणेशोत्सव घडवून आणावा, असे आवाहन केले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News


“हा गणेशोत्सवाला गालबोट लावणारा प्रकार, पुण्यात गणेशोत्सव डीजेमुक्तच हवा.” – पुनीत बालन, प्रसिद्ध उद्योजक आणि उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ https://maharashtramirror.com/ Pune News

  • काही मंडळांच्या प्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांची तीव्र शब्दांत नाराजी
  • २०० सार्वजनिक गणेश मंडळे पारंपरिक वाद्यांच्या बाजूने https://maharashtramirror.com/ Pune News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button