
ACB Arrest Bribe Person In Dharashiv : 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशिव पथकाची कारवाई
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील लोहारा आरोग्य विभागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Dharashiv Bribe News आरोग्य विभागातील पॅरामेडिकल वर्कर (कंत्राटी) नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50) यांना 15 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. Dharashiv ACB Trap ही कारवाई काल (25 मार्च) रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सेंट्रल बिल्डिंग, धाराशीव येथे करण्यात आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हा लोहारा येथील पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग) पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराचे फेब्रुवारी व मार्च 2025 चे पगार व 2023-24 मधील टी.ए. बिल प्रलंबित होते. आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने संबंधित पगार व टी.ए. बिल काढून देण्यासाठी डॉ. कोरे व सांखिकी सहाय्यक माळी यांच्याकडून बिल मंजूर करून देण्याचे आश्वासन देत 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रार पडताळणी करताना आरोपीने पंचांसमक्ष 27 हजार रुपये मागणी केल्याचे सिद्ध झाले. तडजोडीनंतर 15 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. कारवाई दरम्यान नरसिंग सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून 15 हजार रुपये स्वीकारले असता, लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे,सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड (ला.प्र.वि. धाराशीव) आणि सापळा पथक पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सचिन शेवाळे, विशाल डोके, नागेश शेरकर, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले, दत्तात्रय करडे यांनी कारवाई केली आहे.