क्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

थेरगावात कोयत्याने हल्ला; दहशत माजवणारे दोघे जेरबंद

जुन्या वादातून त्यांनी प्रथम शिवीगाळ नंतर कोयते काढून हल्ला

पिंपरी: थेरगाव परिसरात मध्यरात्री तरुणांच्या टोळक्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत माजविल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. ही घटना २१ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास समर्थ क्लिनिकसमोर, जगतापनगर, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी सौरभ विलास चौधरी (वय २४, रा. थेरगाव) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२) व रितेश क्षीरसागर (वय २१, दोघे रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आपल्या मित्रांसोबत परिसरात गप्पा मारत उभे असताना आरोपी एक्सेस दुचाकीवरून तेथे आले. जुन्या वादातून त्यांनी प्रथम शिवीगाळ केली आणि त्यानंतर कोयते काढून हल्ला चढवला. आरोपी गौरव वाघमारे याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर इतर आरोपींनीही कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. “मध्ये आलात तर संपवून टाकू,” अशी धमकी देत आरोपींनी नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button