Pune News : फुलबाजार फुलला; दोन दिवसांत दर दुप्पटआवक वाढली; झेंडू, शेवंती, गुलछडी आणि ॲस्टरला सर्वाधिक मागणी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फुलबाजारात तेजी आली आहे. झेंडू, शेवंती, गुलछडी आणि ॲस्टर या फुलांना सर्वाधिक मागणी असून, गेल्या दोन दिवसांत त्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. श्रावण महिना आणि पितृपक्षात कमी भाव मिळाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मार्केट यार्डातील फुलबाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि बीड जिल्ह्यांतून झेंडूची आवक होत आहे. घाऊक बाजारात सध्या झेंडूचा दर किलोला २० ते ५० रुपये, शेवंतीचा १०० ते १६० रुपये, गुलछडीचा २५० ते ४०० रुपये, तर ॲस्टरचा ८० ते १२० रुपये आहे. नवरात्रीनिमित्त फुलांची आवक वाढण्याची शक्यता आहे. घटस्थापनेनंतर पुढील चार दिवस मागणी काहीशी कमी राहण्याची शक्यता असून, नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेपासून दसऱ्यापर्यंत आवक आणि मागणी पुन्हा वाढेल.https://maharashtramirror.com/ Pune News
“फुलांची आवक वाढली असली, तरी ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. नवरात्रीनिमित्त आवक वाढण्याचा अंदाज असून, पाचव्या माळेपासून बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होईल,” असे अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे समन्वयक सागर भोसले यांनी सांगितले.


