महाराष्ट्र
Trending

Bharat Sheth Gogawale : महायुतीत पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; रायगडमध्ये तटकरेंना मान मिळाल्याने गोगावले नाराज?

Bharat Sheth Gogawale Latest News : ध्वजारोहणावरून ‘नाराजीनाट्य’, गोगावले कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

मुंबई :- स्वातंत्र्यदिनासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या ध्वजारोहण यादीने महायुतीमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा समोर आणली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि मंत्री भरत गोगावले नाराज झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या नाराजीमुळेच गोगावले आजच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे यंदा 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी गोगावले यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, शासनाने सोमवारी जाहीर केलेल्या यादीत तटकरे यांचे नाव असल्यामुळे गोगावले यांच्यासह रायगडमधील शिवसैनिक नाराज झाले आहेत.

गोगावले यांच्या अनुपस्थितीमागे नाराजी?

मुंबईबाहेर असून आज कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. मात्र, राजकीय वर्तुळात कौटुंबिक कारण सांगितले जात असले तरी, ध्वजारोहणाच्या मानपानावरूनच ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यातही संघर्ष आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. या वादावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ही पालकमंत्रीपदाची यादी नसून फक्त ध्वजारोहणाची यादी आहे,’ असे सामंत यांनी स्पष्ट केले, तर ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य आहे,’ असे दादा भुसे म्हणाले. मात्र, या नाराजीनाट्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद उघड झाले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button