क्राईम न्यूज

Pune Crime : स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका

Pune Crime :कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी पोलिसांचा छापा; एका महिलेला अटक

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : स्पा आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याच्या माहितीवरून कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी पोलिसांनी एका व्यावसायिक इमारतीतील दुकानावर छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एका महिलेला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.https://maharashtramirror.com/Pune Crime
बेकायदेशीर व्यवसायांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना गोपनीय माहिती मिळाली. साळवे गार्डनशेजारील अल्टिमेंट बिझनेस सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर स्पाच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांना समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे आणि पथकाने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने खात्री केल्यानंतर संबंधित दुकानावर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आणि संशयित महिलेला अटक केली..https://maharashtramirror.com/Pune Crime
या प्रकरणी २० ऑक्टोबर रोजी कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३, ३(५) आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ४, ५, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक दिपक कराडे, उपनिरीक्षक आकाश विटे आणि पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिपक कराडे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button