Baramati News:बारामतीत मुलाने मित्रांच्या मदतीने आईचे दागिने लांबवले
Baramati News : तालुक्यातील रुई गावात १.५६ लाखांची घरफोडी
Baramati News बारामती: मौजमजा करण्यासाठी पोटच्या मुलानेच आपल्या मित्रांच्या मदतीने घरातील कपाटातून लाखांचे सोन्याचे दागिने चोरून ते विकल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील रुई गावात समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Baramati News
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुक्मिणी शहाजी भोसले (वय ४१, रा. रुई, ता. बारामती) या खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एप्रिल २०२६ ते ०६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अचानक गायब झाले. यामध्ये सोन्याची अंगठी, सोन्याची कर्णफुले, लहान-मोठी मंगळसुत्रे व इतर सोन्याच्या मण्यांचा समावेश होता. https://maharashtramirror.com/ Baramati News
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता, हा पराक्रम त्यांच्याच मुलाने केल्याचे उघड झाले. मुलगा समर्थ शहाजी भोसले याने त्याचे मित्र श्रीनाथ संतोष शिंदे व दर्शन पांडुरंग निकम (सर्व रा. रुई, ता. बारामती) यांच्या सांगण्यावरून आईच्या संमतीशिवाय कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर हे सर्व सोन्याचे दागिने मोडून आलेल्या पैशांतून तिघांनी मिळून मौजमजा केली.
आईने दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार काळे करत आहेत.


