पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पवना नदीत पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

तीन दिवसांमध्ये सात जणांचा गेला जीव

पिंपरी: उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि विकेंडच्या निमित्ताने मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील थूगाव परिसरातील पवना नदी पात्रात ही घटना घडली. तीन दिवसांमध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापूर्वी धरण परिसरात तीन तर नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला होता.

रविवारी प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृतांची नावे आहेत. रविवार सुट्टी असल्याने हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सध्या वाढत असलेल्या उकाड्यामुळे त्यांना नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ शिवदुर्ग मित्र मंडळ यांनी तातडीने मदतकार्य राबवून मृतदेह बाहेर काढले. पर्यटनासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नदी-नाल्यात पोहताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button