पुणेमनोरंजनविशेष

Pune News : ए.एस. डान्स अॅकॅडमीच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगलेल्या वातावरणात पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंदाची उधळण केली. ‘ढोलिडा ढोलिडा’सारख्या लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली, तर आकर्षक पारंपरिक वेशभूषा आणि उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर नृत्यमय झाला. ए.एस. डान्स अॅकॅडमीतर्फे आयोजित गरबा-दांडिया कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. १८ रोजी आंबेगाव येथील वॉव अॅकॅडमीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ए.एस. डान्स अॅकॅडमीचे संस्थापक व नृत्य प्रशिक्षक अंकुर शिंदे आणि ऋतुजा शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना पारंपरिक गरबा आणि दांडियाचा आनंद घेता यावा, तसेच भारतीय संस्कृतीतील या नृत्यपरंपरेची ओळख अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.https://maharashtramirror.com/Pune News

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा केली होती. रंगीबेरंगी पोशाख, तालबद्ध संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांसह पालकांनीही गरबा आणि दांडियामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. नृत्याच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याची आणि आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली.

गरबा आणि दांडिया हे केवळ नृत्यप्रकार नसून संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामूहिक आनंद यांचा सुंदर संगम आहे. हीच परंपरा जपत ए.एस. डान्स अॅकॅडमीतर्फे दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. अॅकॅडमीच्या नृत्य प्रशिक्षणामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नृत्याची आवड निर्माण होत असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठही उपलब्ध होत आहे.

“नवरात्रोत्सव हा आपल्या संस्कृतीतील उत्साह, परंपरा आणि एकतेचा सुंदर संगम आहे. विद्यार्थ्यांना केवळ नृत्याचे प्रशिक्षण देणे एवढाच आमचा उद्देश नसून, त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरांचा आनंद घेता यावा आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी आम्ही दरवर्षी गरबा-दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करतो. यंदाही विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, याचा विशेष आनंद आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद हीच आमच्या मेहनतीची खरी पावती आहे. ‘Dance Today, Shine Tomorrow!’ या ध्येयवाक्यानुसार विद्यार्थ्यांना नृत्याच्या माध्यमातून आत्मविश्वास, आनंद आणि स्वतःची कला सादर करण्याची संधी देत राहणे, हेच आमचे ध्येय आहे.

अंकुर शिंदे, संस्थापक व नृत्य प्रशिक्षक, ए.एस. डान्स अॅकॅडमी

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button