क्रीडापुणे

Pune News : आंतरशालेय जलतरण स्पर्धेत श्रावणी नीलवर्णला दोन सुवर्णपदके

Pune News : २०० आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक; अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : आंतरशालेय जलतरण स्पर्धेत सर परशुराम महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी जयदीप नीलवर्ण हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तिने २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे तिची अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डेक्कन येथील टिळक जलतरण तलावात झालेल्या या स्पर्धेत श्रावणीने पहिल्या दिवशी २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या दिवशी ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारातही तिने सुवर्णपदक मिळवत आपली कामगिरी कायम ठेवली.

श्रावणीच्या या यशाबद्दल सर परशुराम महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक अतुल जगताप आणि वैभव ठोंबरे यांनी तिचे कौतुक केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

श्रावणी ही पुण्यातील घोरपडे पेठ येथील शार्क अ‍ॅक्वाटिक क्लबमध्ये प्रशिक्षक सायली ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करते. तिला हर्षद इनामदार आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button