Pune University : बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेट उघड; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने फुटले बिंग

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बनावट पदवी प्रकरणावर स्पष्टीकरण; सत्यशोधन समिती गठित
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ३ लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट पदवी प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एका सामान्य रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे हा कथित गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून, या रॅकेटमुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. Pune University Bogus Degree Racket B Com

रिक्षाचालकाच्या सतर्कतेने बिंग फुटले
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक महेश कदम हे आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाविषयी माहिती घेण्यासाठी व प्रवेशासंदर्भात चौकशी करण्यासाठी विद्यापीठात गेले होते. त्या वेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी अन्य ३ ते ४ साथीदारांसह संगनमत करून, ३ लाखांच्या मोबदल्यात बी.कॉम. (B.Com.) पदवीचे अस्सल दिसेल असे प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी दर्शवली, असा गंभीर आरोप महेश कदम यांनी केला आहे.
ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे कदम यांनी सुरुवातीला काही रक्कम आगाऊ दिली. त्यानंतर या रॅकेटमधील व्यक्तींनी त्यांना बी.कॉम.चे कथित पदवी प्रमाणपत्र हातात टेकवले. मात्र, या प्रमाणपत्राची पाहणी करताना कदम यांच्या निरिक्षणात एक मोठी त्रुटी आली. प्रमाणपत्रावर सध्याचे अधिकृत नाव असलेल्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा उल्लेख नसून जुन्या पॅटर्ननुसार ‘युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असा उल्लेख होता, ज्यामुळे त्यांना तीव्र संशय आला. याशिवाय, त्यांना अन्य वेगवेगळ्या वर्षांची ४ बनावट पदवी प्रमाणपत्रेही दाखवण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या संशयाला अधिकच बळ मिळाले. Pune University
विद्यापीठ प्रशासनाकडून सत्यशोधन समिती गठित
हा संशयास्पद आणि गंभीर प्रकार लक्षात येताच, महेश कदम यांनी तात्काळ हा सर्व प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाकडे एका विशिष्ट विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र व पदवीसंबंधी अधिकृत तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीत विद्यापीठाच्या अधिकृत नावाचा आणि लोगोचा गैरवापर करून गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे अत्यंत हुशारीने बनावट तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. Pune University
Pune : ‘देवाभाऊंचा निरोप’च्या नावाखाली पुण्यात सुरू आहे कोट्यावधींची लूट
प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंची सखोल व निपक्षपाती चौकशी करण्यासाठी माननीय कुलगुरूंच्या आदेशानुसार एका विशेष ‘सत्यशोधन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. Pune University

बनावट पदवीच्या बळावर नाशिकरोड मुद्रणालयात नोकरी
पुणे विद्यापीठातील या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, दुसऱ्या एका स्वतंत्र आणि तितक्याच गंभीर घटनेत बनावट पदवी प्रमाणपत्राचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय येथे नोकरी मिळवलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीचा काळाधंदा उजेडात आला आहे. Pune University
विशेष म्हणजे, हा आरोपी मागील तब्बल आठ वर्षांपासून या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्रणालयात ‘कनिष्ठ कार्यालय सहाय्यक’ पदावर नोकरी करत होता. बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या जोरावर ही शासकीय नोकरी बळकावल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या आरोपीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार आणि रॅकेटचा कसून शोध घेत आहेत.
शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुरु असलेली अशा प्रकारची बोगसगिरी आणि बनावट प्रमाणपत्रांचे जाळे संपूर्ण शिक्षण व प्रशासन क्षेत्रासाठी चिंतेची बाब ठरत असून, यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. Pune University
PMC News : गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित विकसकांचीच
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ओळख असलेल्या आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस पदवी देण्याचं दुकानच काही कर्मचाऱ्यांनी थाटल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. एकीकडं विविध परीक्षांना पेपरफुटीचा रोग लागला असताना दुसऱ्या बाजूने पुणे विद्यापीठातच ३-३ लाखांत बोगस डिग्री मिळत असेल तर यामुळं विद्यापीठाच्या लौकिकाला काळिमा लागतोच शिवाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचाही हा अवमान आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षणाच्या पवित्र मंदिरात बोगसगिरीचं दुकान उघडणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नामांकित विद्यापीठ असलेल्या या विद्यापीठाचा कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी ताबा घेतला आणि यामुळं विद्यापीठाची कशी बदनामी होते, याचाही अभ्यास झाला पाहिजे. राज्यपाल तथा कुलपती महोदयांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं.
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
https://www.instagram.com/reel/DbVnHtbtpyN/?igsh=MXdrZXliNWRndXpsZw==


