क्राईम न्यूजपुणे

Pune crime : पुणे शहरातून बारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बारा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हे आदेश जारी केले असून, या सर्व आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

तडीपार केलेल्या गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय माहिती: पर्वती पोलीस ठाणे – दीपक प्रकाश गायकवाड (वय २४, रा. जनता वसाहत, पर्वती), चेतन संजय भालेराव (वय २७, रा. दांडेकर पूल), भिमा शत्रुघ्न शिंदे (वय २५, रा. जनता वसाहत, पर्वती), भारती विद्यापीठ पोलीस ठाणे- अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. आंबेगाव पठार), सरफराज उर्फ डर समीर शेख (वय २४, रा. कात्रज), महेश उर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडे नगर, कात्रज)https://maharashtramirror.com/ Pune crime

बिबवेवाडी पोलीस ठाणे- केतन शाम टेमकर (वय २३, रा. अप्पर बिबवेवाडी), खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे (वय २४, रा. इंदिरा नगर, बिबवेवाडी) सहकारनगर पोलीस ठाणे- जितेंद्र उर्फ मोन्या संजय लोंढे (वय २५, रा. तळजाई वसाहत, पद्मावती), रोहन राजेंद्र रोंगे (वय २०, रा. धनकवडी) स्वारगेट पोलीस ठाणे- नरेश उर्फ नब्बा सचिन दिवटे (वय २५, रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड), आंबेगाव पोलीस ठाणे – जितेंंद्र शंकर चिंधे (वय ३२, रा. लिपाणेवस्ती, आंबेगाव / कर्वेनगर) ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते यांनी केली आहे. भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

गंभीर गुन्ह्यांची नोंद:

या सर्व आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्रासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, अग्निशस्त्रे बाळगणे, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि महिलांशी छेडछाड यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button