पुणे

Pune News : कांद्याच्या दरात मोठी तेजी; किरकोळ बाजारात ७० रुपयांवर भाव

Pune News : पावसाच्या दडीमुळे उत्पादनावर परिणाम; घाऊक बाजारात किलोला ४२ ते ५० रुपये दर

Pune News पुणे : लांबलेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसत असून, देशातील प्रमुख कांदा उत्पादक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने बाजारातील आवक घटली आहे. परिणामी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दीड महिन्यांपूर्वी १८ ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता दर्जानुसार ४२ ते ५० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना कांद्यासाठी ६० ते ७० रुपये किलो मोजावे लागत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे मार्केट यार्डातील कांदा बाजारात पुणे जिल्ह्यासह श्रीगोंदा, पारनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतून कांद्याची आवक होते. शुक्रवारी (४ सप्टेंबर) बाजारात सुमारे १०० गाड्यांची आवक झाली. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दरात तेजी कायम आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

दक्षिण भारत हा कांद्याच्या उत्पादनासाठी तसेच मोठ्या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा भाग मानला जातो. यंदा दक्षिण भारतातील अनेक कांदा उत्पादक भागांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकावर परिणाम झाला आहे. देशातील अन्य प्रमुख कांदा उत्पादक भागांमध्येही पावसाची कमतरता असल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र, आता दरात झालेल्या वाढीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) येथील शेतकरी नितीन थोरात यांनी कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सांगितले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला भाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button