PUNE NEWS : स्वारगेट आगाराला पुणे महापालिकेकडून स्वच्छतेचे धडे

आषाढी वारीसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबवली धडक मोहिम ; उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून पाहणी
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: स्वारगेट येथील राज्य परिवहन महामंडळाच्या तथा एसटी डेपो परिसराला पुणे महापालिकेच्या परिमंडळ ५ चे उपायुक्त माधव जगताप यांनी मंगळवारी (दि.१६) अचानक भेट देउन तेथील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची पाहणी केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि पुणे शहरात येणाऱ्या लाखो प्रवाशांची सुरक्षितता आणि आरोग्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आली आहे.PUNE NEWS

या पाहणी दरम्यान त्यांनी डेपो परिसरातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
उपायुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वारगेट डेपो प्रशासनाने आपल्या दैनंदिन स्वच्छता पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल केले आहेत.
आता या संपूर्ण डेपो परिसराची नियमितपणे दिवसातून अनेकदा स्वच्छता केली जात अाहे. यावेळी गोळा होणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यांमध्ये वर्गीकरण केला जात आहे. हा वर्गीकृत केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडीकडे नियमितपणे सुपूर्द केला जात आहे. तसेच डेपोतील कचरा गोळा करण्याचे मुख्य पॉईंट्स अधिक सुटसुटीत आणि नेटके ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे दुर्गंधी सुटणार नाही आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
यावेळी एसटी डेपोमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष तपासणी करून तिथे नियमित पाणी आणि स्वच्छतेची चोवीस तास प्रभावी व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचे प्रात्यक्षिक अधिकाऱ्यांनी दाखवले. PUNE NEWS
या पाहणी दरम्यान डेपोमधील सर्व सफाई कर्मचारी आणि संबंधित कर्मचारी हा महापालिकेने ठरवून दिलेल्या त्यांच्या अधिकृत गणवेशात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना आढळून आला.PUNE NEWS
पाहणी मोहिमा नियमितपणे राबवणार
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी पुणे महानगरपालिका सातत्याने कार्यरत असून अशा प्रकारच्या पाहणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबवल्या जातील, असे उपायुक्त माधव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
PUNE NEWS


