पुणे

Pune: ससून परिसरातील वाहतूक वळवली; नेमकं काय कारण?

Pune: बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाची धोकादायक पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळला

पुणे, महाराष्ट्र मिरर

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या मुलांच्या वसतिगृह परिसरातील ५० फूट उंच आणि २ लाख लिटर क्षमतेची जुनी गोलाकार पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाल्याने शनिवारी सकाळी तिचा वरील भाग कोसळला. ही टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे परिसरात तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली.

आज सकाळी ६:४३ वाजता टाकी पडण्याच्या स्थितीत असल्याची वर्दी मिळताच पुणे महानगरपालिका अग्निशमन दल (वाहन क्रमांक MH12NY 4028) अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन, बांधकाम विभाग, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बी.जे. वैद्यकीय प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांनी तातडीने सूत्रे हलवली. Pune

PMC: कचरा वेचकांच्या सुरक्षिततेबाबत पुणे महापालिका उदासीन

Ganeshotsav 2026 च्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत मोठे बदल

दुर्घटनाग्रस्त परिसराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून वाहने अन्य मार्गांवर वळवण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि बी.जे. वैद्यकीय प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित असून, उर्वरित धोकादायक ढाचा सुरक्षितपणे पाडण्याबाबतचे तांत्रिक नियोजन सुरू आहे. pune

सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील रत्यावर दुतर्फा बॅरिकेटिंग करून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच, मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी व स्थानिक रहिवाशांना सुरक्षिततेच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने पुढील धोकादायक भाग उतरवण्याची व सुरक्षेची कार्यवाही सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button