CRIME NEWS : वाकडमध्ये दोन लाखांचा गुटखा जप्त

बेकायदेशीर गुटखाविक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पिंपरी CRIME NEWS: वाकड येथील कस्पटेवस्ती रोडवर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (८ जून) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.CRIME NEWS

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव झेंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (३२, वाकड) याला ताब्यात घेतले आहे. कस्पटेवस्ती येथील लक्ष्मी मोटर्सच्या मागे एका पत्र्याच्या खोलीत आरोपीने आरोग्यास घातक असलेला पानमसाला व गुटखा लपवून ठेवला होता. पोलिसांनी छापा टाकून दोन लाख, आठ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.CRIME NEWS
वाकड पोलीस तपास करीत आहेत.
CRIME NEWS


