पुणे

Pune News : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुरेल जागर; ‘माझी दिवाळी’ गीत  रसिकांच्या भेटीला !

Pune News : पुणे – महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, परंपरेचे आणि सण-उत्सवांचे दर्शन घडवणारा दिवाळीचा सण प्रत्येक घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवाळीच्या आनंदोत्सवाला सुरेल संगीताची जोड देत लेखक – दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी खास मराठमोळे दिवाळी गीत रसिकांच्या भेटीला आणले आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक दिवाळीचे मनोहारी दर्शन घडवणारे हे गीत सध्या रसिकांसाठी उपलब्ध झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

‘तोरण मांगल्याचे बांधू दारी,
चला रांगोळी काढू अंगणी।
आली दिवाळी… अंगणी माझ्या,
माझी दिवाळी…!’
अशा सुंदर आणि अर्थपूर्ण शब्दांनी सजलेल्या या गीतातून मराठी संस्कृतीचा गोडवा अनुभवायला मिळतो. घरासमोरील आकर्षक रांगोळ्या, दारावरील आंब्याच्या पानांची तोरणे, दिव्यांची रोषणाई आणि नात्यांमधील आपुलकी यांचे सुंदर चित्रण या गीतात करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा विविध सणांचे सांस्कृतिक महत्त्व या गीतातून उलगडण्यात आले आहे. प्रवीण मेहंदी निर्मित आणि ‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत या गीताचे लेखन व दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले आहे. संगीताची धुरा हर्षित अभिराज यांनी सांभाळली असून गायिका गायत्री शेलार आणि गायक हर्षित यांनी गीताला स्वर दिले आहेत. या गीतात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, हेमल इंगळे यांच्यासह प्रज्वल ओसवाल, प्रमोद ओसवाल आदी कलाकारांचा सहभाग आहे. नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार यांनी केले आहे. तर प्रोडक्शन हेड कृष्णा साबळे हे आहेत. विक्रांत कुलकर्णी हे असिस्टंट डायरेक्टर आहेत. हे दिवाळी विशेष गीत ‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button