मुंबई

Chitra Wagh On Thackeray Faction Ad : शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं अभिनय भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

‘आदू बाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ

मुंबई :- लोकसभा निवडणुकीमुळे देशासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्तर-प्रत्युत्तर सुरू आहे. यातच शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं अभिनय केल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवाल चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या ज्या जाहिराती येत आहेत. त्या ‘आदू बाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेले पात्र हे पॉर्नस्टार असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये अतिशय कीळसवाने पब, पार्टी आणि पॉर्न अशी संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे का? त्यांच्या या आदू बाळ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेडने बनवलेल्या जाहिरातींमध्ये पॉर्न स्टार महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? असा प्रश्न विचारतोय. असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.

महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? असा प्रश्न विचारणारा हा पॉर्न स्टार लहान मुलींवर अत्याचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. याच व्यक्तीचे घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडिओ आणि क्लिप एका ॲपवर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, पब, पार्टी आणि पॉर्न असा प्रकार त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आणायचा आहे का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

“हा पॉर्नस्टार एकीकडे मुलींबरोबर अश्लील चाळे करताना दिसतो. दुसरीकडे हा पॉर्नस्टार म्हणतो, ‘महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?’ आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातींवर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडावी. तसेच, केंद्र सरकारनं अशा अ‍ॅपवरती बंद घालावी. म्हणजे उद्धव ठाकरेंना, असे पॉर्नस्टार पुन्हा सापडणार नाहीत,” असा घणाघातही चित्रा वाघ यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0