Chhota Rajan News : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा दिलासा! जन्मठेपेची शिक्षाही स्थगित
•Underworld Don Chhota Rajan News Update अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे, हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर
मुंबई :- 90 च्या दशकात मुंबईवर राज्य करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला Chhota Rajan मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात हायकोर्टाने छोटा राजनला जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने Chhota Rajan शिक्षेला दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नेमके काय प्रकार आहे?
दक्षिण मुंबईतील ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक असलेले शेट्टी यांची त्यांच्या कार्यालयासमोर 4 मे 2001 रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर अजय सुरेश मोहिते उर्फ अजय सुरजभान श्रेष्ठ या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. नेपाळी उर्फ चिकना याला दोन बंदुकांसह रंगेहात पकडण्यात आले. त्याने शेट्टीवर गोळी झाडल्याचा आरोप आहे, तर सहआरोपी कुंदनसिंग रावत पळून जाण्यात यशस्वी झाला पण नंतर त्याला पकडण्यात आले. खटल्याच्या समाप्तीपूर्वी रावत यांचे निधन झाले आणि मोहिते दोषी ठरल्यानंतर पॅरोलवर असताना चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. मोहितेसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि हा निकाल काही महिन्यांपूर्वी राजनला दोषी ठरवून शिक्षा देण्यावर अवलंबून होता.शेट्टीच्या मुलांनी साक्ष दिली की त्यांना राजनकडून Chhota Rajan 50 लाखांची मागणी करणाऱ्या खंडणी कॉलची माहिती होती, जी त्यांच्या वडिलांनी देण्यास नकार दिला होता.