मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सपना चौधरी यांचा घटस्फोटासाठी अर्ज; ‘नाते टिकणारच नव्हते’हनुमान म्हणजे भारताचे ‘आयर्न मॅन’ : नमित मल्होत्राॲक्टिंग क्लासमध्ये झाडू मारताना रडकुंडीला आली होती दीपिकारामायणची जगभरात १,७०० कोटींची झेपशंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवडमहिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदावर अमेरिका आणि ब्रिटनची बाजी!

शहरातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानाचा निर्णय

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

शहरातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानाचा निर्णय

निलेश राऊत
पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याबराबेरच बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या, त्याखाली क्षेत्र, झोपडीधारकांची संख्या, त्यांचे निश्चित ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सध्या ५५७ झोपडपट्ट्या आहेत. मात्र, २०११ आणि २०१७ मध्ये राज्य शासनाने महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश केला. त्यामुळे पुणे महापालिकेबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीतदेखील वाढ झाली आहे. या वाढीव हद्दीसह दोन्ही शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पामध्ये झोपडपट्ट्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच प्रत्येक झोपडीला स्वतंत्र नंबर देण्यात येणार आहे. तर झोपडीतील रहिवाशांचे देखील बायोमेट्रिक ठसे आणि फोटो घेतले जाणार आहेत. त्याचबरोबरच त्यांच्या कागदपत्रांची देखील माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय झोपडपट्टीची हद्द निश्चित करणे, त्यांचे लोकेशन, त्या खालील क्षेत्राबरोबरच झोपडीधारकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पुनर्वसन योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे न्युज

शेअर करा