पुणे
Trending

Ajit Pawar Latest News : निरोप दादांना! अजितदादांचे पार्थिव ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये दाखल; थोड्याच वेळात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Ajit Pawar Latest News: काटेवाडीत ग्रामस्थांना फुटला पाझर; राज ठाकरे, रितेश देशमुख यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

बारामती | महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघी बारामती आज रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 9 वाजता काटेवाडी येथील निवासस्थानावरून अजितदादांचे पार्थिव रुग्णवाहिकेने विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना काटेवाडीतील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले, अनेकजण धाय मोकलून रडताना दिसले.

मैदानावर दिग्गजांची मांदियाळी
अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर बारामतीत दाखल झाले आहेत.

राजकीय नेते: मनसे प्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार (झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक, जयंत पाटील), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक कॅबिनेट मंत्री.

मनोरंजन क्षेत्र: अभिनेता रितेश देशमुख यांनीही बारामतीत पोहोचून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रीय नेते: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी काही वेळातच मैदानात पोहोचणार आहेत.
अंतिम विधींचे नियोजन (थेट अपडेट्स):

थेट मैदानावर आगमन: गर्दीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंत्ययात्रा न काढता पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेण्यात येत आहे.

शासकीय मानवंदना: पोलिसांच्या वतीने अजितदादांना हवेतील फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाईल.

अंतिम निरोप: सकाळी 11 वाजता सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर अजितदादांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल.

जनसागराचा महापूर

कोल्हापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईहून लाखो समर्थक बारामतीत दाखल झाले आहेत. “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी विद्या प्रतिष्ठानचा परिसर दुमदुमून गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः मैदानात उपस्थित असून ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button