क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

वानवडीत चोरट्यांनी तरुणाची ८० हजारांची सोन्याची चेन पळवली

फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक काकडे मैदानाजवळ बोलत उभे होते

पुणे: वानवडी परिसरातील संविधान चौक येथे भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका तरुणाच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेदहाच्या सुमारास काकडे मैदानाच्या समोर घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक वानवडीतील फ्लोव्हर व्हॅली सोसायटीसमोर असलेल्या काकडे मैदानाजवळ बोलत उभे होते. यावेळी दुचाकीवरून दोन अनोखळी तरुण त्यांच्या पाठीमागून आले. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन शिताफीने हिसकावली आणि दुचाकीवरून वेगाने पळ काढला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक काही काळ चक्रावून गेले. परिसरात वर्दळ असतानाही चोरट्यांनी हे धाडस केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) आणि ३(५) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासले जात आहे

Thieves steal gold chain worth Rs 80,000 from youth in Wanwadi

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button