Traffic : १५ दिवसांत सिंहगड रस्ता परिसराचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल द्या

Traffic : महापौर मंजूषा नागपुरे यांचे पोलिस प्रशासनाला निर्देश; वाहतूक वॉर्डन नियुक्तीचा निर्णय
पुणे, महाराष्ट्र मिरर
Traffic : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तब्बल १२० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारूनही या मार्गावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी बुधवारी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच, पुढील १५ दिवसांच्या आत सिंहगड रस्ता परिसराचा सविस्तर वाहतूक सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे सक्त निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.Traffic police Sinhagad Road manjusha nagpure pmc
गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापौर नागपुरे यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीस प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवंर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका प्रवीण गोरे, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, नगरसेवक हरीदास चरवड, सुरज लोखंडे, सुभाष नाणेकर, राजाभाऊ लायगुडे तसेच नगरसेविका कोमल नवले, जयश्री भूमकर, प्रिया गदादे, वृषाली रिठे आणि धनश्री कोल्हे उपस्थित होत्या.

या बैठकीत नगरसेवकांनी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यावर पोलीस नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, अनधिकृत पार्किंग तसेच अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत वारंवार पोलिसांना पत्रे देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का?
या बैठकीत महापौरांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यावर पोलीस दिसत नाहीत. जे पोलीस उपस्थित असतात, ते वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त असतात, अशी टीका त्यांनी केली. तसेच, सण, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना परवानगी देताना वाहतूक कोंडी तसेच ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादांचा पुरेसा विचार केला जात नसल्याने त्याचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चौकांमध्ये पोलीस उपस्थित असल्यास नागरिकांवर त्याचा धाक राहतो आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होते. मात्र, पोलीसच नसतील तर वाहतूक कोंडी होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी महापालिकेच्या निदर्शनास का आणू नये, अशी विचारणाही त्यांनी केली. तसेच, रस्त्यांवर व चौकांमध्ये मिरवणुकांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनीप्रदूषणाच्या समस्येबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

सिंहगड रस्त्यावरील धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव तसेच दांडेकर पुलापर्यंतचे मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि प्रमुख चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पोलिसांनी महापालिकेला द्यावा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने आवश्यक उपाययोजना करून वाहतूक वॉर्डनची नियुक्ती केली जाईल. तात्पुरता उपाय म्हणून मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. Traffic
Pune : धानोरीतील पोरवाल रस्त्यावर एमएनजीएल गॅस पाईपलाईन गळती
बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळी व संध्याकाळी होत असलेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीबाबत तीव्र संताप व्यक्त केला. शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना या त्रासाचा सामना करावा लागत असून, वारंवार पत्र देऊनही पोलीस कारवाई करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. Traffic

बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
- वर्दळीच्या वेळी प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.
- अतिक्रमणाविरोधात पोलीस आणि महापालिकेने संयुक्त मोहीम राबवावी.
- अनधिकृत पार्किंगला कठोर आळा घालावा.
- दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा.
- वाहतुकीस अडथळा ठरणारी महावितरणची उपकरणे (DP) व ओव्हरहेड केबल्स हटवाव्यात.
- रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे बसथांबे योग्य ठिकाणी स्थलांतरित करावेत. वाढते नागरीकरण आणि वाहतुकीचे वास्तव
गेल्या दहा वर्षांत धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, कोल्हेवाडी, नांदेड सिटी या भागात प्रचंड नागरीकरण झाले आहे. या परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सिंहगड रस्ता हाच एकमेव मुख्य मार्ग असल्याने यावर प्रचंड ताण येतो. उड्डाणपुलापूर्वी येथील वाहनांचा सरासरी वेग अवघा ९ किलोमीटर प्रति तास होता. Traffic
MH 12 पुण्याची ऐतिहासिक ओळख कायम राहणार?
सकाळी या भागातून शहरात येणारी ८० टक्के वाहने कर्वेनगरकडे, तर २० टक्के स्वारगेटकडे वळतात. मात्र, राजाराम पूल संपल्यानंतर १०० मीटरच्या अंतरावर तीन वेगवेगळ्या दिशेने वाहने येत असल्याने माणिकबाग ते नांदेड सिटीपर्यंत प्रचंड कोंडी होते. सोमवारीही सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सलग चार तास या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
उड्डाणपूल ते ‘बॉटलनेक’ची समस्या
महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईमपर्यंत दुहेरी उड्डाणपूल उभारल्यामुळे चार सिग्नल कमी झाले आणि वाहनचालकांचा ३० ते ३५ मिनिटांचा वेळ अवघ्या ४ मिनिटांवर आला. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरथोड्याच कालावधीत पुलावरील पोलिसांची संख्या कमी करण्यात आली. दुसरीकडे, राजाराम पूल चौकात ‘बॉटलनेक’ची (रस्ता अरुंद होण्याची) गंभीर समस्या निर्माण झाली आहे. Traffic
तसेच, उड्डाणपुलाखालील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक पुन्हा खाली येतात. माणिकबाग चौक, हिंगणे चौक आणि प्रकाश इमानदार चौकात रस्तyावरच वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जाते. विशेष म्हणजे, दिवसा वर्दळीच्या वेळी जड वाहतुकीस बंदी असतानाही रेडीमिक्स ट्रक, हायवा आणि राडारोडा नेणारे मोठे डंपर राजरोसपणे या मार्गावरून ये-जा करतात. यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे उड्डाणपुलावर आणि खाली दोन्हीकडे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. Traffic
आता महापौरांच्या या १५ दिवसांच्या डेडलाईननंतर पोलिस व महापालिका प्रशासन मिळून या समूळ प्रश्नावर नेमकी काय ठोस कारवाई करते, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. Traffic
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


